कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न:
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध ‘फिंद्री’ कादंबरीच्या लेखिका मा. डॉ. सुनिता बोर्डे-खडसे उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, ध्येयपूर्तीसाठी करावा लागणारा त्याग व समाजाचा पाठिंबा यांचे प्रभावी वर्णन केले. स्वतःचा जीवनप्रवास उलगडून त्यांनी विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागप्रमुख मा. श्रीराम साळुंखे सर होते. त्यांनी महाविद्यालयातील सकारात्मक बदलांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये नवी ऊर्जा व उत्साह निर्माण होत असल्याचे सांगितले.
स्वागताध्यक्ष मा. प्रा. संगीता पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. जिमखाना विभागाचा अहवाल डॉ. सविता भोसले यांनी सादर केला. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कै. रेखा माळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती विमल माळी यांच्या देणगीतून स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. दुपारच्या सत्रात विद्यार्थिनींनी विविध नृत्यप्रकार सादर करत गुणदर्शन कार्यक्रम रंगवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती हाळवणकर व प्रा. अंकुश कुरणे यांनी केले, तर आभार डॉ. अनिता आंबोकर यांनी मानले.
मनोगत व्यक्त करताना सुनीता बोर्डे-खडसे,श्रीराम साळुंखे,प्रा.त्रिशला कदम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







