इचलकरंजीत घरफोडी; ५५ हजारांचा ऐवज चोरी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत कबनूर येथील गांधी विकासनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशांत सुरेश पाटील (वय ३५, व्यवसाय किराणा दुकानदार, रा. गांधी विकासनगर गल्ली नं. १, कबनूर) यांच्या राहत्या घरात दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.१० ते ११.०० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी घरातून सुमारे ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.
या प्रकरणी सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले (वय ३२, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपास करत चोरीस गेलेला संपूर्ण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीची ही घटना बंदिस्त जागेत घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







