प्रबोधिनीत दोन व्याख्यानांचे आयोजन
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने गुरुवार ता.२ आणि शनिवार ता.४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्याने आयोजित केली आहेत. यातील पहिले व्याख्यान सध्या युद्धज्वराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न जगभर निर्माण झालेले आहेत.या पार्श्वभूमीवर या विषयाची सखोल माहिती व्हावी यासर्व ” अमेरिका- इस्त्रायल-इराण युद्धाचे परिणाम ” या विषयावर होणार आहे. त्याचे वक्ते मा.डॉ.श्रीराम पवार (आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ख्यातनाम अभ्यासक ) हे आहेत. तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.अशोक चौसाळकर ( ज्येष्ठ राजकीय विचारवंत व अध्यक्ष समाजवादी प्रबोधिनी) हे आहेत. तर दुसरे व्याख्यान ख्यातनाम इतिहासकार व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अलीकडेच कालवश झाले. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यासंगी लेखन कार्याची सखोल माहिती व्हावी यासाठी ” डॉ.जयसिंगराव पवार यांची इतिहासदृष्टी” या विषयावर प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील (इतिहासाचे नामवंत अभ्यासक ) यांचे होणार आहे. ही दोन्ही व्याख्याने समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहेत. तरी या व्याख्यानाला इचलकरंजी आणि परिसरातील जिज्ञासू बंधू भगिनींनी यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








