ICHMH51NEWS.IN
9921600800

यड्राव फाटा येथे वाहतूक नियंत्रण करणे आले अंगलट चालकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यड्राव फाटा येथे वाहतूक नियंत्रण करणे आले अंगलट चालकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

शहापूर:
 यड्राव फाटा चौकात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत असताना चालकास तिघा अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी  सायंकाळी घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार सुभाष बाळोसो पाटील (वय ४२, रा. श्यामनगर, यड्राव फाटा) हे चौकात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांना मार्गदर्शन करत होते. त्यावेळी खोतवाडीच्या दिशेने आलेल्या मारुती सुजुकी कंपनीच्या स्पिट कारला थांबण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या तिघा अज्ञात इसमांनी “आमची कार थांबवणार तू कोण?” असे म्हणत पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली.
घटनेनंतर पाटील यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक फौजदार मुंगसे करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा