ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत हाडांच्या ठिसूळपणासाठी मोफत तपासणी शिबीर उत्साहात.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत हाडांच्या ठिसूळपणासाठी मोफत तपासणी शिबीर उत्साहात.

इचलकरंजी :
मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) यांच्या वतीने हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) तपासण्यासाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन (MOA), कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशन (KOA) आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन यांच्या सहकार्याने १ मे रोजी हे शिबिर पार पडले.
या शिबिरात ३५ वर्षांवरील तसेच कंबरदुखी, पाठदुखी व सांधेदुखीने त्रस्त असलेल्या सुमारे २२० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना औषधोपचार देण्यात आले, तसेच हाडांची झीज टाळण्यासाठी व ठिसूळपणा कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र अभ्यंकर उपस्थित होते. त्यांनी वाढत्या वयात हाडांची घनता कमी होण्याची कारणे, त्यावरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. महेश महाडिक यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. राजीव नेगंधी यांनी मांडली. डॉ. श्रीकांत नायकुडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन श्री. कृष्णकांत भुतडा यांनी केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन जाधव, डॉ. अमित देशमुख, डॉ. उत्तम माळी यांच्यासह अनेक डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा