ICHMH51NEWS.IN
9921600800

पाठीमागून टेम्पोची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकावर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाठीमागून टेम्पोची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकावर गुन्हा

इचलकरंजी :

शाहूनगर-चंदूर परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास आभार फाट्याकडे जात असताना जिव्हाजी बँकेसमोर टेम्पो (एमएच-०५-बीएच-९२०१) चालक मोहम्मद साद सब्बीर पिंजारी (वय २३, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत पाठीमागून दुचाकी (एमएच-०९-सीसी-१५२८) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार बळवंत आश्राप्पा देसाई (वय ५७, रा. शाहूनगर गल्ली क्र. ४, चंदूर, ता. हातकणंगले) हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचे पुत्र किशोर बळवंत देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा