ICHMH51NEWS.IN
9921600800

‘लोका’च्या नावाने चहापत्ती पॅकिंग; यड्रावमध्ये १० लाखांचा मुद्देमाल जप्त,दास फूड अँड बेव्हरेजेसवर शहापूर पोलिसांची कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘लोका’च्या नावाने चहापत्ती पॅकिंग; यड्रावमध्ये १० लाखांचा मुद्देमाल जप्त,दास फूड अँड बेव्हरेजेसवर शहापूर पोलिसांची कारवाई

इचलकरंजी : 

प्रतिनिधी
यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती इंडस्ट्रीजमधील प्लॉट क्रमांक एकमध्ये सुरू असलेल्या दास फूड अँड बेव्हरेजेसवर शहापूर पोलिसांनी छापा टाकून १० लाख ४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कंपनीच्या परवानगीशिवाय ‘लोका प्रीमियम गार्डन फ्रेश तृप्ती’ या नावाचा व लोगोचा वापर करून चहापत्तीचे पॅकिंग केले जात असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी हैदराबाद येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रा. लि.चे प्रादेशिक प्रमुख नागेश्वरराव कृष्णमुर्ती नंदीगामा (वय ४६) यांनी शाहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दास फूड अँड बेव्हरेजेसवर छापा टाकला. त्यावेळी चहापत्तीचे पॅकिंग व शिवणकाम सुरू असल्याचे आढळले. पॅकिंग केलेल्या पिशव्यांवर ‘लोका प्रीमियम गार्डन फ्रेश तृप्ती’ असा मजकूर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी सुटी चहापत्ती, विविध वजनांचे पॅक केलेले चहाचे पाऊच, पॅकिंग मशीन, शिवणयंत्र, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आदी साहित्य जप्त करून कंपनी सील केली.

जप्त मुद्देमालामध्ये २५० ग्रॅम चहापत्तीचे १४० पाऊच असलेली ५४ पोती व १०८ सुटे पाऊच असा ८ लाख ४३ हजार ४८० रुपयांचा माल, ५०० ग्रॅमचे २० पाऊच, पॅकिंग मशीन, शिवणयंत्र व वजनकाटा यांचा समावेश आहे.

या प्रकरणी दास फूड अँड बेव्हरेजेसचे मालक भिकुदास रामचंद्र मांडवकर (वय ४१) यांच्याविरुद्ध कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शाहापूर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा