ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ९ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत प्रलंबित महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्याची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ९ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत प्रलंबित महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्याची संधी

इचलकरंजी :
महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ९ ऑक्टोबर रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यांतील प्रलंबित महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील प्रलंबित दावे पक्षकारांच्या परस्पर संमतीने व कमी कालावधीत निकाली काढण्याची संधी महसूल लोकअदालतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचून प्रकरणांचा सुलभतेने निपटारा होण्यास मदत होणार आहे.

उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांच्या न्यायालयात हातकणंगले व शिरोळ तालुक्यांशी संबंधित महसुली दावे प्रलंबित आहेत. या लोकअदालतीबाबत कोल्हापूर जिल्हा तसेच तालुका बार असोसिएशनच्या माध्यमातून विधिज्ञांना माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित पक्षकारांनाही याबाबत अवगत करण्यात आले आहे.

तडजोड करू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी दोन्ही पक्षकारांनी अथवा आवश्यकतेनुसार त्यांच्या विधिज्ञांमार्फत ‘नमुना अ’ या विहित नमुन्यात तडजोडनामा अर्ज सादर करावा. दोन्ही पक्षकारांच्या संमतीने तडजोडनामा तयार करून संबंधित महसुली दावे निकाली काढण्यात येणार आहेत.

प्रलंबित महसुली प्रकरणातील पक्षकार व विधिज्ञांनी लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा