ICHMH51NEWS.IN
9921600800

कबनूरमध्ये व्यावसायिकाकडे दरमहा ५ हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; सहा जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कबनूरमध्ये व्यावसायिकाकडे दरमहा ५ हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; सहा जणांवर गुन्हा

इचलकरंजी :
कबनूर येथे व्यावसायिकाला दरमहा पाच हजार रुपये देण्याची धमकी देत खंडणी मागणे, घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल अनिल शिंदे, आशपाक मुल्ला, लकी खान, फहीम सलीम राऊत, मुबारक मुजावर आणि रेहान जमादार अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी अस्लम मिरासाब बागवान (वय ३३, रा. धुळेश्वर नगर, कबनूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, राहुल शिंदे याने जुलै महिन्यात फिर्यादीच्या सर्व्हिसिंग सेंटरवर जाऊन दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर १० जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मोटारसायकल परत देण्याच्या कारणावरून फिर्यादीला फोनवर शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादी बाहेरगावी असल्याची माहिती असताना संशयितांनी त्यांच्या घरात प्रवेश करून भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीला शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.
फिर्यादी घडल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी जात असताना तिघांनी चारचाकी वाहन अडवून पुन्हा दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक माने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न