ICHMH51NEWS.IN
9921600800

सुनिल महाजन व सौ. विजया महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुनिल महाजन व सौ. विजया महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

इचलकरंजी : इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तथा श्री साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक सुनिल सीताराम महाजन आणि विद्यमान नगरसेविका सौ. विजया सुनिल महाजन यांच्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त १५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजसेवेचा वसा जपत हा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी जवाहरनगर येथील श्री साई मंदिरात स्वच्छता अभियान, महाआरती व प्रसाद वाटपाने सप्ताहाची सुरुवात होईल. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सेवाभारती रुग्णालय व इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येईल. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दत्तनगर व विठ्ठलनगर येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होईल. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांना टी-शर्ट वाटप तसेच तारदाळ येथील मायेची सावली अनाथाश्रमात नाश्ता व फळवाटप करण्यात येईल.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी कृष्णानगर येथील श्री लक्ष्मीनारायण गोशाळेत गायींसाठी चारा वाटप केले जाईल. बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महेश क्लब येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी राधाकृष्ण चौकात मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी गरजू व दिव्यांगांना दिवाळी फराळ व धान्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ज्येष्ठांना ब्लँकेट व स्टील टिफिन वाटप करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सत्कार व केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे.

या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न