ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय; दररोज महाआरती, दुर्गा सप्तशती पारायण व भजनांचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय; दररोज महाआरती, दुर्गा सप्तशती पारायण व भजनांचे आयोजन

इचलकरंजी, प्रतिनिधी :

शहापूर येथील कोरोची रोडवरील श्री तुळजाभवानी ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात येत आहे. तसेच सकाळी ११ वाजता दुर्गा सप्तशती पारायण आणि दुपारी ४ वाजता विविध महिला भजनी मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत शिवगौरी महिला भजनी मंडळ, जय हिंद महिला भजनी मंडळ, संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ, स्वामिनी महिला भजनी मंडळ आणि श्री तुळजाभवानी महिला भजनी मंडळ यांचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय भक्तिगीत व कथ्थक नृत्याचा विशेष कार्यक्रम आणि शिवमंदिर भारुड भजनी मंडळाचा भारुड कार्यक्रमही आयोजित केला आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी कुंकुमार्चन व हवन होणार आहे.

मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घटोत्थापन, तर दुपारी ४ वाजता श्री राजवर्धन निंबाळकर सरकार यांच्या हस्ते पालखी प्रदक्षिणा व सीमोल्लंघन सोहळा होणार आहे.

रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी ११ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता पालखी (छबिना) उत्सव आणि रात्री ९ वाजता देवीचा जागर होणार आहे.

या नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष नाना जाधव व सचिव सिद्धू अण्णा पुजारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा