ICHMH51NEWS.IN
9921600800

इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

इचलकरंजी, दि. १४ ऑक्टोबर : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मानसिक आरोग्याचे महत्त्व, मानसिक आजारांविषयी जागरूकता आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची प्रस्तावना मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारक प्रकाश राठोड यांनी केली. डॉ. संदीप, मनोविकृती समाजसेवा अधीक्षक अक्षय तोडकर आणि मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी काकडे यांनी मानसिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली.

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. मानसिक तणाव जाणवल्यास तो दुर्लक्षित न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, अधिसेविका चारुशिल्पा येमल, सहायक अधिसेविका सीमा कदम, बाह्यरुग्ण विभागाच्या परिचारिका रोहिणी चंदनशिवे, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करून गरजू व्यक्तींना योग्य उपचार व मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.


मार्गदर्शन करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा