ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत अवैध दारूसाठा जप्त; ३,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत अवैध दारूसाठा जप्त; ३,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

इचलकरंजी : शहरातील दातार मळा परिसरात विनापरवाना बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने दारूसाठा बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. जीवन धोंडिराम वरुटे (वय ३२, रा. दातार मळा, गल्ली क्रमांक ३, इचलकरंजी) असे संशयिताचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार १९० रुपयांचा दारूसाठा जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास दातार मळा येथील गल्ली क्रमांक ३ मधील चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर ही कारवाई करण्यात आली. वरुटे हा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना दारूसाठा बाळगून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईत २ हजार २०० रुपये किमतीची सुमारे २२ लिटर गावठी हातभट्टीची दारू, ४४० रुपये किमतीच्या जी.एम. डॉक्टर कंपनीच्या देशी दारूच्या ११ बाटल्या आणि ५५० रुपये किमतीच्या व्हाईट रॉयल संत्रा कंपनीच्या २२ बाटल्या असा एकूण ३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ सुधाकर रानभरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घुगे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा