ICHMH51NEWS.IN
9921600800

चार दिवसांच्या रोषणाईसाठी २५ लाखांची उधळपट्टी कशासाठी? फेरीवाल्यांना न्यायालयाचा धाक, मग विद्युत रोषणाईसाठी परवानगी कोणाची? विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा महापौर व प्रशासनाला सवाल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चार दिवसांच्या रोषणाईसाठी २५ लाखांची उधळपट्टी कशासाठी?

फेरीवाल्यांना न्यायालयाचा धाक, मग विद्युत रोषणाईसाठी परवानगी कोणाची? विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा महापौर व प्रशासनाला सवाल

इचलकरंजी : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शिवतीर्थ ते शंभूतीर्थ ते गांधी पुतळा या मार्गावर केवळ चार दिवसांच्या विद्युत रोषणाईसाठी अंदाजे २० ते २५ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केला आहे. जनतेच्या कररूपी पैशाची ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल करत त्यांनी महापौर उदय धातुंडे व महापालिका प्रशासनाकडे खर्चाचा अधिकृत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याच मार्गावर छोटे व्यापारी व फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी म्हणून आंदोलने केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत प्रशासनाने त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला. मग त्याच रस्त्यावर विद्युत रोषणाईसाठी कोणत्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत असताना जनतेच्या पैशातून रोषणाईवर लाखो रुपये खर्च करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या खर्चाऐवजी कायमस्वरूपी विद्युत खांब उभारून वर्षभर उपयोगी पडणारी व्यवस्था करता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.

रोषणाईसाठीचा नेमका खर्च, निधीचा स्रोत, परवानगीची कागदपत्रे, निविदा प्रक्रिया, ठेकेदार, कार्यादेश व अंदाजपत्रक सार्वजनिक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिवतीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राजर्षी शाहू महाराज पुतळा आणि प्रांत कार्यालय या मार्गांवरही रोषणाई करण्याचा विचार करावा, असे त्यांनी सुचवले.

इचलकरंजीकरांच्या पैशाचा हिशेब इचलकरंजीकरांना मिळालाच पाहिजे. जनतेच्या पैशाचा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आदर्श शिक्षक पुरस्काराने दोन शिक्षिकांचा गौरव,२०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी शिक्षकांच्या हातून – डॉ. अनिल मडके; शिक्षकांच्या १०० टक्के वेतनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – आमदार कौस्तुभ गावडे  

चार दिवसांच्या रोषणाईसाठी २५ लाखांची उधळपट्टी कशासाठी? फेरीवाल्यांना न्यायालयाचा धाक, मग विद्युत रोषणाईसाठी परवानगी कोणाची? विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा महापौर व प्रशासनाला सवाल

आदर्श शिक्षक पुरस्काराने दोन शिक्षिकांचा गौरव,२०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी शिक्षकांच्या हातून – डॉ. अनिल मडके; शिक्षकांच्या १०० टक्के वेतनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – आमदार कौस्तुभ गावडे