ICHMH51NEWS.IN
9921600800

नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचा भाजपा कार्यालयात सत्कार,सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते गौरव; इचलकरंजीसाठी आमदार निधीतून भरघोस निधी देण्याचे गावडे यांचे आश्वासन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचा भाजपा कार्यालयात सत्कार,सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते गौरव; इचलकरंजीसाठी आमदार निधीतून भरघोस निधी देण्याचे गावडे यांचे आश्वासन

इचलकरंजी :
पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नूतन विधानपरिषद सदस्य कौस्तुभ गावडे यांचा शुक्रवारी (दि. ६) शहर भाजपा कार्यालयात माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा इचलकरंजी पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बोलताना सुरेशराव हाळवणकर म्हणाले, कौस्तुभ गावडे यांनी विधानपरिषदेत सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली असून शिक्षकांच्या प्रश्नांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करावी. आपल्या कार्यातून विधानपरिषदेतील उत्कृष्ट आमदार म्हणून ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा संकल्प करून गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू केले होते. भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शिक्षकांच्या प्रश्नांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. तसेच सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढविण्यासाठी काम करणार असून आमदार निधीतून इचलकरंजीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान, मनोज साळुंखे, प्रमोद बचाटे, विशाल दास, महेश पाटील, राजू भाकरे, शिवानंद रावळ, नागूताई लोंढे, अरुण कुंभार, शुभम बरगे, सागर कचरे यांच्यासह विविध आघाड्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शशिकांत मोहिते यांनी केले.

आ.कौस्तुभ गावडे यांचा सत्कार करताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आदर्श शिक्षक पुरस्काराने दोन शिक्षिकांचा गौरव,२०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी शिक्षकांच्या हातून – डॉ. अनिल मडके; शिक्षकांच्या १०० टक्के वेतनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – आमदार कौस्तुभ गावडे  

चार दिवसांच्या रोषणाईसाठी २५ लाखांची उधळपट्टी कशासाठी? फेरीवाल्यांना न्यायालयाचा धाक, मग विद्युत रोषणाईसाठी परवानगी कोणाची? विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा महापौर व प्रशासनाला सवाल

आदर्श शिक्षक पुरस्काराने दोन शिक्षिकांचा गौरव,२०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी शिक्षकांच्या हातून – डॉ. अनिल मडके; शिक्षकांच्या १०० टक्के वेतनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – आमदार कौस्तुभ गावडे