राज्य किशोर किशोरी निवड चाचणी स्पर्धेसाठी
मंगसुळे व लवटे यांची जिल्हा संघात निवड
इचलकरंजी/प्रतिनिधी –
पिंपरी चिंचवड येथे आयोजित 36 व्या राज्य किशोर किशोरी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात गंगामाई स्पोर्ट्सची मृणाली मधुकर मंगसुळे आणि डायनॅमिक स्पोर्ट्सची वैष्णवी महादेव लवटे या दोघींची निवड झाली आहे.
या दोघींना प्रशिक्षक शेखर शहा, बी. ए. माने आणि के. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहेत. तर मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे. या निवडीबद्दल संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासाहेब वडींगे, स्कुल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, विश्वस्त यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या








