ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षण सोडतीने राजकीय हालचालींना वेग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षण सोडतीने राजकीय हालचालींना वेग

इचलकरंजी, ता. ११ : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत आज मोठ्या उत्साहात पार पडली. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपायुक्त नंदू परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत प्रक्रिया श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सुमारे तासभर चालली. सकाळी अकरा वाजता सोडतीला प्रारंभ झाला. कार्यक्रमास इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक तसेच नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, तसेच नाट्यगृह परिसरात मोठ्या स्क्रीनद्वारे नागरिकांना थेट माहिती मिळाली. सुरुवातीला अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. सहा प्रभागांपैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या. चिठ्ठ्या विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आल्याने वातावरणात विशेष उत्साह होता. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी सोडत पार पडली. या प्रवर्गातील एकूण १७ जागांपैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. काही जागा थेट तर काही चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आल्या. शेवटी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २१ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उर्वरीत २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या ठेवल्या गेल्या. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाली. आरक्षण सोडतीनंतर आता इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विविध पक्षांकडून उमेदवार निवड प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. एकूण प्रभाग १६ असून एकूण सदस्यसंख्या ६५ आहे. त्यामध्ये सर्वसाधारण ४२ (महिला २१), अनुसूचित जाती ६ (महिला ३) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ (महिला ९) असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीदरम्यान उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी शिस्तबद्धतेने सहभाग नोंदविला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा