बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक-जयसिंगपूर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी
जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात धडक कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी छापा टाकून 68,400 रुपयांच्या हुबेहुब बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता करण्यात आली. पोलिस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे साहील रफिक मुल्लाणी वय 26, राहणार उदगाव, तालुका शिरोळ, ओंकार बाबुराव तोवार राहणार इचलकरंजी, सध्या राहणार दानोळी आणि रमेश संतराम पाटील वय 29, राहणार जुना चंदूर रोड, इचलकरंजी अशी आहेत. पोलिसांनी उदगाव येथील गट क्रमांक 145 मधील गोट्यात आणि इचलकरंजीतील बरगे मळा परिसरात छापा टाकला असता, 100 रुपयांच्या एकूण 684 बनावट नोटा, HP Smart Tank 525 मॉडेलचा प्रिंटर, प्लॅस्टिक स्केल, कटर, कागद आदी साहित्य मिळाले. आरोपी बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







