इचलकरंजीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी प्रांताधिकारी दीपक शिंदेचे ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
इचलकरंजी : प्रतिनिधी
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, ६ नोव्हेंबर २०२५ हा नोंदणीचा अंतिम दिनांक आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रक्रियेसाठी ६ नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या नियंत्रणाखाली इचलकरंजी महापालिकेच्या झोन कार्यालयात प्रत्यक्ष नोंदणी सुरू आहे. तसेच https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी शिंदे यांनी पात्र पदवीधरांनी आपली नोंदणी पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







