कन्या महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये उत्साहात पार पडल्या.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटनेच्या अध्यक्ष माननीय सौ स्मिता बुगड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. आपले शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटाशी लढायला तयार असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या विविध खेळांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम उपस्थित होत्या.विविध स्पर्धांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा.वर्षा पोतदार, कनिष्ठ विभागाच्या प्रमुख श्रीमती सोनाली बोरगांवकर उपस्थित होत्या.
पहिल्या दिवशी खो-खोच्या स्पर्धा पार पडल्या.दुसऱ्या दिवशी कबड्डीच्या स्पर्धा पार पडल्या. तर तिसऱ्या दिवशी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या.या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला.
या सर्व स्पर्धांचे नियोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सविता भोसले, जिमखाना विभाग प्रमुख कनिष्ठ श्री अमित कुंडले तसेच डॉ.प्रतिभा पैलवान,प्रा.किरण कानडे, प्रा. स्वाती हाळवणकर, श्रीमती नयना कणसे यांनी केले.
गुणलेखक म्हणून डॉ. मनोज जाधव प्रा. सुधाकर इंडी यांनी काम पाहिले. तर परीक्षक म्हणून डॉ.अनिता आंबोकर, श्रीमती सोनाली बोरगावकर, श्रीमती स्मिता साळुंखे,प्रा. प्रियांका साळोखे, प्रा.शाईन फकीर, प्रा. निकिता बडे यांनी काम पाहिले.
कु. कोमल राठी या विद्यार्थिनींने सर्वांना क्रीडा शपथ दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील गुरव व प्रा. अंकुश कुरणे यांनी केले.
वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री संजय गुजर तसेच प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







