इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, प्रभारी सहाय्यक आयुक्त नितिन बनगे, तसेच रामचंद्र कांबळे, बेबी नदाफ, संदीप जोशी, सदाशिव जाधव, आयुब शेख, महादेव देसाई आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









