राष्ट्रपिता महात्मा गांधी व अजित दादांना शहर काँग्रेसतर्फे आदरांजली
इचलकरंजी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे दुःखद निधना निमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री विशाल कांबळे व राजन मुठाणे यांची हस्ते त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी मा. अजित दादांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी मा. अजित दादांच्या विचारावर पुढे जावे लागेल असा विचार व्यक्त केला.
यावेळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंगाडे, रवी वासुदेव, सचिन साठे, साजिद मकानदार, रविंद्र पाटील, अनिल पाच्छिंद्रे, अनिल कदम, नासीर गवंडी, रमजान शिकलगार, चंद्रकांत मिस्त्री, अण्णा कांबळे, दिलीप भोई, सुदाम साळुंखे, प्रशांत लोले, गजानन शिरगांवे, राजू किणेकर चाँद नदाफ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







