इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे महात्मा गांधी व हुतात्म्यांना अभिवादन
इचलकरंजी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी चौक येथील पूर्णाकृती पुतळा तसेच म. गांधी उद्यान येथील अर्धपुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ३० जानेवारी हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जात असल्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार, माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, प्रभारी नगरसचिव राहुल पोटे, विद्युत अभियंता इसरार बेग, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधीना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









