ICHMH51NEWS.IN
9921600800

हाळवणकरांना पाठिंब्याचा प्रश्नच नाही : शिव-शाहू विकास आघाडीची स्पष्ट भूमिका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हाळवणकरांना पाठिंब्याचा प्रश्नच नाही : शिव-शाहू विकास आघाडीची स्पष्ट भूमिका

इचलकरंजी:
शहरातील एका कार्यक्रमात शिव-शाहू विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी भाजप नेत्यांची भेट घेऊन माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिव-शाहू विकास आघाडीचे निमंत्रक शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे आणि कॉ. सदा मलाबदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, आघाडीचा भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही नगरसेवकांनी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून त्याचा आघाडीशी कोणताही संबंध नाही.
आघाडी ही केवळ इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी घटकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. तसेच राज्य पातळीवरील महाविकास आघाडीच्या धोरणाशी सुसंगत भूमिका घेण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यामुळे भाजप किंवा त्यांच्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नसल्याचे आघाडीने ठामपणे जाहीर केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा