ICHMH51NEWS.IN
9921600800

१२ कोटींच्या रस्ते कामाला आणखी ६ कोटींची भर; शिव-शाहू विकास आघाडीचा प्रशासनावर निशाणा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

१२ कोटींच्या रस्ते कामाला आणखी ६ कोटींची भर; शिव-शाहू विकास आघाडीचा प्रशासनावर निशाणा

इचलकरंजी : महानगरपालिकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या रस्ते बळकटीकरण व मजबुतीकरण प्रकल्पासाठी आणखी ६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाची शक्यता निर्माण झाल्याने शिव-शाहू विकास आघाडीने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका मांडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक, थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल आणि निरामय हॉस्पिटल ते महासत्ता चौक या मार्गांवरील एकूण १२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, काम सुरू झाल्यानंतर सीईटीपी, ड्रेनेज, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन तसेच इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आल्याने रस्ता कमकुवत झाल्याचे संबंधित मक्तेदाराने महानगरपालिका प्रशासनाला कळविले आहे.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तांत्रिक अहवालानुसार रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अतिरिक्त उपाययोजना आवश्यक असल्याने सुमारे ६ कोटी रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे १२ कोटींचा प्रकल्प तब्बल १८ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याप्रकरणी प्रशासनाने वाढीव खर्चाची कारणे, जबाबदारी, अतिरिक्त कामाची प्रक्रिया व निविदा याबाबत जनतेसमोर खुलासा करावा, अशी मागणी शिव-शाहू विकास आघाडीने केली आहे. तसेच उपलब्ध मुरूम व भराव साहित्याचा वापर करून खर्च कमी करण्याचा पर्याय तपासावा, अशीही मागणी करण्यात आली. अन्यथा इचलकरंजीकरांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा आघाडीने दिला आहे.

यावेळी गटनेते उदयसिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, नगरसेवक संजय तेलनाडे व राजू आलासे उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा