कन्या महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची १०८ वी जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांची १०८ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतिहास विभागप्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांनी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा जो वारसा निर्माण केला, त्याचा आदर्श समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरणाच्या आव्हानात्मक काळात प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याने आपली नैतिक जबाबदारी ओळखून कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे. त्यांचे विचार आणि कार्य आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी केले, तर प्रा. अंकुश कुरणे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे यांना अभिवादन करताना प्रा.श्रुती जोशी व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







