ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईत इंजिनिअरिंग प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ‘मी राजवाडा बोलतोय’ ओपन हाऊस सेशन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईत इंजिनिअरिंग प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ‘मी राजवाडा बोलतोय’ ओपन हाऊस सेशन

इचलकरंजी :
डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटतर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण तसेच अभियांत्रिकी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी राजवाडा बोलतोय – ओपन हाऊस सेशन अ‍ॅट कॅम्पस’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, १३ जून रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना डीकेटीईच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, ग्रंथालय, करिअर मार्गदर्शन केंद्र, प्लेसमेंट सेल आदी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे. तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी आणि अनुभवी प्राध्यापकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मागील वर्षांच्या प्रवेश कटऑफची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका मोफत वितरित करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी शिक्षणातील विविध पर्यायांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. ए. के. घाटगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा