ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर पोलिसांची कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक, २ किलो २८९ ग्रॅम गांजासह २.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी :

 शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २ किलो २८९ ग्रॅम गांजा, दुचाकी मोपेड व तीन मोबाईल असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोची गावच्या हद्दीतील चव्हाणवाडी टेकडी परिसरात नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांजा विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई रोहित डावाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरबिंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंग (वय २४, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. शिवाजीनगर, कोरोची), मोहसीन इर्शाद सनदी (वय २४, रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) आणि सार्थक श्रीप्रसाद बिंद (वय २०, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोरोची) यांचा समावेश आहे.

या कारवाईत ५७ हजार २२५ रुपये किमतीचा गांजा, १ लाख २० हजार रुपये किमतीची आय क्युब मोपेड दुचाकी व ५७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोउनि महावीर कुटे व गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आ
गांजा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपीसह शहापूर पोलीस

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा