लिटिल मोअर’ मंत्र जपत विद्यार्थ्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत : डॉ. विरूपाक्ष खानाज
इचलकरंजी:
विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासत व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. मिळालेल्या यशावर समाधानी न राहता ‘लिटिल मोअर’ हा मंत्र जपत आयुष्यात अधिक उंची गाठण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज यांनी केले.
हटकर कोष्टी समाज युवक मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांच्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नामदेव भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे उपाध्यक्ष प्रभाकर उरणे होते.
यावेळी दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. वसंत महिंद व सुरेश पाडळे यांना ‘समाज भूषण’, तर प्रवीण पाडळे व सुषमा पाटील यांना ‘उद्योग भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनायक अक्कतंगेरहाळ, अरुण म्हेत्रे, सुधाकर घारसे व मल्लिकार्जुन हळळी यांना ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने यांनी युवक मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित खानाज यांनी केले. आभार हेमंत वरुटे यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा प्रसंगी छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







