ICHMH51NEWS.IN
9921600800

‘एक झाड आईच्या नावे’ मोहिमेंतर्गत इचलकरंजीत वृक्षारोपण; आयुक्त पल्लवी पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘एक झाड आईच्या नावे’ मोहिमेंतर्गत इचलकरंजीत वृक्षारोपण; आयुक्त पल्लवी पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

इचलकरंजी:
 घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “एक झाड आईच्या नावे” या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नागरिकांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ किंवा सन्मानार्थ किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले.
वाढते प्रदूषण, हवामान बदल व पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, सहायक आयुक्त रोशनी गोडे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, सयाजी चव्हाण, नगरसेविका मनीषा कुपटे, मोनाली मांजरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महानगरपालिकेचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

वृक्षारोपण करताना आयुक्त पल्लवी पाटील व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा