ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची २७ लाख ८३ हजारांची फसवणूक; राजस्थानातील चौघांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची २७ लाख ८३ हजारांची फसवणूक; राजस्थानातील चौघांवर गुन्हा

इचलकरंजी:
 कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून २७ लाख ८३ हजार २२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजस्थानमधील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दीपक तेजराज पारीक (रा. पारिक हौसिंग सोसायटी, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद रामस्वरूप गर्ग, सरजूप्रसाद रामस्वरूप गर्ग व गोपाल मदनलाल पारीक (सर्व रा. बालोत्रा, जि. बाडमेर, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी आपण देशभर मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय करीत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२३ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादीकडून २ कोटी ३० लाख २४ हजार ८ रुपयांचा कापड माल खरेदी केला. त्यापैकी २ कोटी २ लाख ४० हजार ७८० रुपये देण्यात आले असून २७ लाख ८३ हजार २२८ रुपये बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन देत चेक व आरटीजीएस फॉर्मचे फोटो पाठवून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. चौकशीनंतर परवानगी मिळाल्याने शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक माने करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा