ICHMH51NEWS.IN
9921600800

लोककल्याण मंडळाच्या ‘सामाजिक दांपत्य भोजन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अधिक मासानिमित्त १२५ दांपत्यांचा सहभाग; कुटुंबव्यवस्था व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोककल्याण मंडळाच्या ‘सामाजिक दांपत्य भोजन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अधिक मासानिमित्त १२५ दांपत्यांचा सहभाग; कुटुंबव्यवस्था व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
इचलकरंजी
येथील लोककल्याण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘सामाजिक दांपत्य भोजन’ कार्यक्रमाला शहरातील विविध स्तरांतील कुटुंबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात ९ व १० जून रोजी अनुक्रमे ५५ आणि ७० अशा एकूण १२५ दांपत्यांनी सहभाग नोंदविला.
समाजातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरांतील कुटुंबांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सहभागी दांपत्यांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावल्याने वातावरणाला सांस्कृतिक रंग लाभला. भोजनापूर्वी पुरुषांना उपरणे व दिवा, तर महिलांची ओटी भरून पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. संपूर्ण उपक्रमात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला असून उद्घोषणा फलकही कापडी स्वरूपात तयार करण्यात आले होते. तसेच प्रत्येक कुटुंबाला देशी वृक्षाचे रोप भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या निमित्ताने ‘कुटुंबव्यवस्था – आव्हाने आणि उपाय’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील कुलकर्णी, मानसशास्त्र अभ्यासक आर्या देशपांडे आणि अनुभवी गृहिणी उमा गरुड यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीतील कौटुंबिक आव्हाने, सुसंवादाचे महत्त्व, संयुक्त व विभक्त कुटुंब पद्धती तसेच सकारात्मक बदलांची गरज यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दत्तात्रय गर्गे व अजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कुटुंब ही समाज व राष्ट्राची मूलभूत संस्था असून तिचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. उपस्थित दांपत्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा