ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये १० लाख वार्षिक पॅकेजवर निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये १० लाख वार्षिक पॅकेजवर निवड

इचलकरंजी :
येथील डीकेटीई संस्थेच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील तेजस फिरंगे व विश्वदीप संपकाळ या दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे झेन्सार टेक्नॉलॉजीज या अग्रगण्य आयटी कंपनीमध्ये वार्षिक १० लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे.
चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्लेसमेंट प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य व गुणवत्तेच्या बळावर हे यश मिळवले. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाउड टेक्नॉलॉजी, डेटा इंजिनिअरिंग आणि आयटी सोल्यूशन्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये निवड होणे हे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक मानले जात आहे.
डीकेटीईमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावर दिला जाणारा भर यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होत आहेत. यापूर्वीही संस्थेतील विद्यार्थ्यांनी ४५ लाख, ४२ लाख, २५ लाख, २२ लाख आणि १८ लाख रुपयांच्या पॅकेजवर नामांकित कंपन्यांमध्ये निवड मिळवली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

झेन्सॉर कंपनीत निवड झालेले विद्यार्थी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा