रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यावर महापालिकेची ५ हजारांची कारवाई
इचलकरंजी :
सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित नागरिकावर इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाने ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्वच्छ व अतिक्रमणमुक्त शहरासाठी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त विद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले यांच्या सूचनेनुसार बुधवारी मुख्य स्वच्छता निरीक्षक संग्राम भोरे व स्वच्छता निरीक्षक सुरज पांगरे यांनी प्रभागात पाहणी केली.
या वेळी सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित बियानी अँड सन्स यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नियमांनुसार ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
यापुढे रस्त्यावर वाळू, खडी, विटा अथवा अन्य बांधकाम साहित्य विनापरवाना टाकू नये, अन्यथा अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








