जयभीम नगरातील गळतीची कामे शनिवारपासून, १०८ घरांचा प्रस्ताव कौन्सिलसमोर-अँड. सौ. अलका स्वामी
इचलकरंजी :
प्रभाग क्रमांक ६ मधील जयभीम नगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांच्यासमवेत अँड. सौ. अलका स्वामी यांच्या वतीने महापौर उदय धातुंडे यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी इमारतींवरील गळती, पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती तसेच प्रलंबित १०८ घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये जय भीम नगरातील इमारतींमधील गळतीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच पाण्याच्या टाक्यांची आवश्यक दुरुस्ती करून सुविधा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली १०८ घरे तातडीने बांधून पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
महापौर उदय धातुंडे यांनी संबंधित मागण्यांची दखल घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इमारतींवरील गळती दुरुस्तीचे काम शनिवारपासून सुरू करण्यात येईल तसेच १०८ घरांचा प्रस्ताव येणाऱ्या महानगरपालिका कौन्सिलच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
ही मागणी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका अँड. सौ. अलका अशोक स्वामी यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यावेळी समाजकल्याण समितीचे सभापती रुबेन आवळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महापौर उदय धातूंडे यांना निवेदन देताना अँड. सौ. अलका स्वामी,रूबेन आवळे व भागतील नागरिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







