श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालयात वृक्षारोपण
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात शासनाच्या ‘एक पेड माॅं के नाम ३.०’ या उपक्रमांतर्गत कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयीन अधिक्षक संजय गुजर यांच्या हस्ते झाडाचे रोपण केले.तसेच विद्यार्थिनींनी गुलाबाची रोपे लावली.याप्रसंगी प्रा.संगिता पाटील कनिष्ठ विभागातील सोनाली बोरगांवकर व शिक्षक,कार्यालयीन सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.







