इचलकरंजी महानगरपालिकेकडून स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. नाईक यांच्या राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने कायम स्मरणात ठेवावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी सहायक आयुक्त नितीन बनगे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, संदीप जोशी, मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, संगणक अभियंता अजय सुतार, स्वच्छता निरीक्षक बाबू आगा, महादेव देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







