डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परीक्षेत घवघवीत निकाल
इचलकरंजी:
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) उन्हाळी २०२५-२६ परीक्षेत डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले. तिन्ही विभागांमधून दर्शन जितेंद्र श्रीश्रीमाल याने ९०.६५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. संस्थेतील ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, तर ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी आणि फॅशन अँड क्लोदिंग टेक्नॉलॉजी या तिन्ही विभागांतील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेची यशाची परंपरा कायम राखली. टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील रेहान नायकवडी (९०.३७ टक्के) आणि फॅशन अँड क्लोदिंग टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील आरती जाधव (८९.३३ टक्के) यांनीही विशेष यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग व प्राध्यापकांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








