ICHMH51NEWS.IN
9921600800

मौजे शिवनाकवाडी येथे शंभर देशी झाडांचे वृक्षारोपण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मौजे शिवनाकवाडी येथे शंभर देशी झाडांचे वृक्षारोपण

इचलकरंजी
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दत्तक खेडे मौजे शिवनाकवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम’ आणि ‘हरित पायाभूत सुविधा’ उपक्रमांतर्गत शंभर विविध देशी झाडांचे वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. यामध्ये अर्जुन, पिंपळ, पारिजात, बकुळा, बेल, बेहडा, कदंब, उंबर, सोनचाफा अशा शंभरहून अधिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
“जाणीवपूर्वक देशी झाडांचे जतन आणि संवर्धन उपक्रमामुळे पर्यावरणाचे संतुलन राहते. महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाने राबवलेल्या या १०० देशी झाडांचे रोपण उपक्रमामुळे मौजे शिवनाकवाडी हरित करण्यात महाविद्यालयाने खारीचा वाटा उचलला आहे”, आपल्या अध्यक्षीय मनोगतातून असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मा. डॉ. श्रुती जोशी यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना चौगुले, दत्त साखर कारखान्याचे संचालक श्री रणजीतसिंह कदम, लोकनियुक्त सरपंच सौ. सरिता खोत, उपसरपंच श्री. श्रीकांत खोत, गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विद्या मंदिर शिवनाकवाडीमधील शिक्षक वृंद,मौजे शिवनाकवाडीमधील विविध मान्यवर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी केले. तर  मौजे शिवनाकवाडी विद्या मंदिरचे श्री. बाळू यादव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या एन. एस. एस.च्या सदस्य प्रा. स्वाती हाळवणकर, प्रा अंकुश कुरणे यांनी केले.

वृक्षारोपण करताना प्रा. डॉ श्रुती जोशी,रणजित कदम व मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा