हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा; अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देऊ नका – शिष्टमंडळाची मागणी
इचलकरंजी/हातकणंगले :
अंगणवाडी सेविकांना बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून काम देऊ नये, तसेच यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर आणि इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार खिलारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
हातकणंगले येथे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती माहिती घेऊन अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात येणार नाही तसेच पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
त्यानंतर इचलकरंजी येथे अप्पर तहसीलदार खिलारे यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले. हायकोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांकडून बीएलओची जबाबदारी देऊ नये आणि त्याऐवजी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये सुनिल बारवाडे, उमा बनगे, नम्रता कुरणे, शुभदा कुलकर्णी, भारती होळकर, शुभांगी करडे, राजश्री अपराध, कांता कांबळे, शमा मोमीन आदींचा सहभाग होता.
अप्पर तहसीलदार व तहसीलदार यांना निवेदन देताना अंगणवाडी सेविका
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








