ICHMH51NEWS.IN
9921600800

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा इचलकरंजी मेडिकल असोसिएशनकडून तीव्र निषेध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा इचलकरंजी मेडिकल असोसिएशनकडून तीव्र निषेध

इचलकरंजी:
 डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीसह विविध वैद्यकीय संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील माने व प्रांताधिकरी कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ६ जुलै २०२६ रोजी डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉ. वैभव साळुंखे, डॉ. सृष्टी बाविस्कर आणि परिचारिकांवर नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, शासकीय रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त आणि सक्षम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय अथवा बाह्य दबावाशिवाय निर्भयपणे रुग्णसेवा करता येईल, असे सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षाही वैद्यकीय संघटनांनी व्यक्त केली आहे.
हे निवेदन मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, आयएमए, डेंटल असोसिएशन तसेच एमएजीएमओ असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले.

नायब तहसिलदार संजय काटकर यांना निवेदन देताना डॉक्टर्स

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा