ICHMH51NEWS.IN
9921600800

भरधाव ट्रकच्या धडकेत एमएसईडीसीएलचा वीज खांब तुटला; चालकाविरुद्ध गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भरधाव ट्रकच्या धडकेत एमएसईडीसीएलचा वीज खांब तुटला; चालकाविरुद्ध गुन्हा

इचलकरंजी :
लायकर मळा परिसरातील किसान चौक येथे भरधाव ट्रकने एमएसईडीसीएलच्या सिमेंटच्या वीज खांबाला धडक दिल्याने सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत केतन किरण पोवार (वय ३०), सहायक अभियंता, एमएसईडीसीएल पूर्व-पश्चिम विभाग, इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लायकर मळा येथील किसान चौकातील पटेल ट्रान्सफॉर्मरजवळील सिमेंटच्या वीज खांबाला RJ-22 GB-9901 क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात एमएसईडीसीएलच्या मालकीच्या सिमेंट पोलचे नुकसान झाले.
या प्रकरणी कानसिंग (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या ट्रक चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इंदुलकर करत आहेत
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा