मैत्री फाऊंडेशन व मारवाडी युवा मंच यांची अभिनव वारी
इचलकरंजी
इचलकरंजी येथील सुप्रसिद्ध सामाजिक संघटना मैत्री फाऊंडेशन व मारवाडी युवा मंच यांचेवतीने घोसरवाड येथून निघालेल्या पंढरपूर वारीस आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये प्रवासासाठी लागणारा सर्व किराणा माल व बस खर्च देण्यात आला. वारीस निघालेल्या पुरुषाना कुर्ता पायजमा व भगिनिंना साड्यांचे वाटप करण्यात आले.
प्रवासासाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी लायन्स ब्लड बँक इचलकरंजी येथे स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री दामोदरलालजी बाहेती यांनी भुषविले. मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रामकिशोर वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड, महिला अध्यक्षा वहिदा नेजकर व सर्व सदस्य उपस्थित होते. मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष अमृत छाजेड, आशिष भांगडिया, तेजराज भंसाली, प्रांतीय सदस्य जुगल बियाणी, महावीर सिंघवी, रामकिशोर वर्मा तसेच राजपूत सेवा समिती अध्यक्ष प्रेमसिंगजी चौहान उपस्थित होते. श्री दामोदरलालजी बाहेती यांच्या हस्ते वीणा पूजन व वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात कु. साक्षी शिवाजी कांबळे हिला शिक्षणासाठी व राहूल आनंदा गायकवाड याला वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत श्री बाहेती यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व स्वागत – प्रास्ताविक श्री अशोक खोत सर यांनी केले, मारवाडी युवा मंचचे श्री रामकिशोर वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले, वारकऱ्यांच्या वतीने बाबासाहेब पुजारी यांनी आभार व्यक्त केले.भजन व किर्तनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजन देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधुरी सातपुते यांनी विशेष कष्ट घेतले. लायन्स क्लबचे सर्वेसर्वा श्री विजयजी राठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.इचलकरंजी व परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
वारी उपक्रमात सहभागी मैत्री फौंडेशनचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





