ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत तलवारी-कोयत्याने दहशत; महिन्याला ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत तलवारी-कोयत्याने दहशत; महिन्याला ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

इचलकरंजी, ता. २२ : जवाहरनगर परिसरात तलवारी व कोयत्याच्या जोरावर दहशत माजवत महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांसह दहा अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लता मारुती माने (वय ५०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक हिराप्पा तेरणे, दक्ष वडर, ठोंब्या कोळेकर व त्यांच्यासोबतच्या दहा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर येथील माने यांच्या घरासमोर आरोपींनी गैरकायद्याची गर्दी करून तलवारीने सिंटेक्स पाण्याच्या टाकीवर वार केले तसेच घराच्या दरवाजावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकारात सुमारे १,५०० रुपयांचे नुकसान झाले.

यावेळी फिर्यादींचा मुलगा सूरज माने याला “वाहीफनीचा धंदा जोडून दे, अन्यथा दरमहा ५० हजार रुपये दे; नाहीतर जीवे ठार मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळही करण्यात आल्याचे नमूद आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक मस्कर पुढील तपास करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा