ICHMH51NEWS.IN
9921600800

महापारेषणच्या CSR उपक्रमातून दुर्गम भागातील शाळांना संगणकांचे वाटप; १६० शाळांमध्ये विवेक प्रबोधन उपक्रमाची यशस्वी सांगता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापारेषणच्या CSR उपक्रमातून दुर्गम भागातील शाळांना संगणकांचे वाटप; १६० शाळांमध्ये विवेक प्रबोधन उपक्रमाची यशस्वी सांगता

इचलकरंजी/पन्हाळा :

महापारेषण, कराड यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून आणि शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची सांगता दुर्गम भागातील शाळांना संगणक वितरण करून करण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षभरात १६० प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विवेक प्रबोधन सत्रे तसेच १० ठिकाणी महिला सक्षमीकरण मेळावे आयोजित करण्यात आले. प्रकल्पाच्या समारोपानिमित्त पन्हाळा तालुक्यातील असुर्ले, दरेवाडी, नेबापूर तसेच शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील शालेय केंद्रांमध्ये संगणकांचे वितरण करण्यात आले.

विशेष म्हणजे, संगणकांचे वितरण झालेल्या सर्व शाळा दुर्गम व डोंगराळ भागातील आहेत. शाहूवाडी तालुक्यातील आंबा प्राथमिक केंद्र शाळा ही सुमारे १०० वर्षांचा इतिहास असलेली शाळा असून, या शाळेलाही आधुनिक शिक्षणासाठी संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या कार्यक्रमाला महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल घोलपसहायक मुख्य अभियंता प्रमोद गोडसेअधीक्षक अभियंता सचिन तडगी, सांगलीचे देशपांडे व वाघ तसेच कराडचे काटकर उपस्थित होते.

तसेच इचलकरंजीचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर, माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळकेराजू भाकरेसतीश पंडितअरुण कुंभारप्रमोद कडप्पा आणि राजू पाटील यांच्यासह युवा व्याख्याते प्रथमेश इंदुलकरमंदार जोशी आणि विनोद शिंदे उपस्थित होते. असुर्ले येथे वृषाली सरनोबतउदयसिंग सरनोबतअमर भोसले, तर आंबा येथे जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील व पेरिडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

याच कार्यक्रमात शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत दरेवाडी येथील धनराज जाधव या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी दत्तक घेण्याची घोषणा केली. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत करत उपक्रमाचे कौतुक केले.

महापारेषण आणि शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आंबा येथे शैक्षणिक साहित्य वितरण करताना माजी आ.सुरेशराव हाळवणकर, हिंदुराव शेळके,रमा फाटक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा