नरवीर शिवा काशिद यांना इचलकरंजी महापालिकेकडून अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नरवीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त (तिथीनुसार) बुधवारी महापालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त अशोक कुंभार आणि नगरसेवक सयाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त नितीन बनगे यांच्यासह इचलकरंजी नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे, बाबुराव जाधव, रवींद्र क्षीरसागर, भारत मर्दाने, कृष्णात साळोखे, जनार्दन सूर्यवंशी, जयसिंग संकपाळ, हिंदुराव राऊत, मारुती काशीद, आनंदा कीर्तने, बाळासो पवार, सुरेंद्र सपकाळ, नेताजी सपकाळे, प्रवीण जाधव, अर्जुन शिंदे, प्रमोद शिंगे यांच्यासह इचलकरंजी शहर व परिसरातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी नरवीर शिवा काशिद यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन करताना स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक सयाजी चव्हाण व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







