पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सभा संपन्न
(सन 2026 -28 या तीन वर्षा करीता नूतन संचालक मंडळाची निवड )
इचलकरंजी – येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार कक्षात उत्साहात पार पडली यावेळी सन 2026 -28 या तीन वर्षासाठी नूतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी शिवगोंडा खोत होते.
यावेळी खोत म्हणाले गेल्या 48 वर्षापासून आपली संघटना कार्यरत असून जुन्या सभासदानी त्यावेळी कष्ट केले म्हणून संघटना नावारूपास आली त्यावेळी संघटनेच्या माध्यमातून बेळगाव, गोवा येथे संपर्क केला व त्याठिकाणी देखील संघटना तयार व्हावी यासाठी पुढाकार घेतला आज देखील संघटनेच्या पदाधिकारी व सभासदामुळे राज्यात संघटनेचे नाव आदराने घेतले जाते. जाहिरातीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रक्कमेतून सभासदांना मदत केली जाते तसेच दिवाळीभेट वस्तूच्या माध्यमातून संघटना प्रत्येकाच्या घरात पोहचली आहे हे वाटप करताना जास्त कमी अंकाचा विचार नकरता समान पद्धतीने वाटप करण्यात येते असे देशात उदाहरण नाही असे गौरवपर उल्लेख केला तसेच
आज संघटनेमध्ये वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी असली तरी संघटनेचे कार्य करताना पक्षाचा अजेंडा बाहेर ठेवून कार्य करत आहेत त्यामुळे वृत्तपत्रातील सर्व कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळत गेला मात्र संघटना स्थापन करणं सोपं असलेतरी ती मोठीकरून व्यवस्थित चालवणे गरजेचे असते व ते कार्य आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने पदाधिकारी करत आहेत भविष्यात देखील असेच आपण काम करत राहू असे सांगितले
यावेळी संघटनेच्या वतीने *अण्णासो गुंडे यांना आदर्श सेवा*सुरेश चोगुले यांना *समाजरत्न तर आप्पा पाटील यांना प्रगतशील शेतकरी* पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कारला उत्तर देताना तिघांनीही आम्ही वृत्तपत्र विक्रेता असल्याचा अभिमान आहे व या व्यवसायामुळेच आज आम्ही इथेपर्यत पोहचू शकलो असे सांगितले
यावेळी अण्णा गुंडे यांनी विषय प्रत्रीकेचे वाचन केले तर नारायण शिंदे यांनी जमाखर्च मांडला व अभिनंदनचा ठराव अमोल मुंसडे व श्रद्धांजली चा ठराव महेश बावळे यांनी मांडला सूत्रसंचालन व स्वागत शिवानद रावळ यांनी केले तर आभार सुरेश चोगुले यांनी मानले सभेला संचालक भालचंद्र कांबळे, महादेव चिखलकर, विशाल परीट, विजय वाईगडे, कृष्णा हजारे व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
*सन 2026 -28 साठी नूतन संचालक मंडळ निवड*
शिवगोंडा खोत,अण्णा गुंडे, शिवानंद रावळ, अमोल मुसडे, नारायण शिंदे, महेश बावळे, विजय वाईगडे, महादेव चिखलकर, विशाल परीट, कृष्णा हजारे,सुरेश चोगुले, आप्पा पाटील, गणपती माने, रमजान नदाफ, दादासो कांबळे
मार्गदर्शन करताना शिवगोंडा खोत व व्यासपीठावर उपस्थित पदाधिकरी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








