ICHMH51NEWS.IN
9921600800

राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट

हुपरी –
महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांनी साेमवारी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास सपत्निक सदिच्छा भेट दिली. यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याच्या ऊस विकास याेजनेतून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती केलेल्या क. सांगाव येथील सुरेश नाभिराज मगदूम या सभासद शेतकèयांच्या ऊस शेतीची आणि तळंदगे येथील कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेर्माफत राबविण्यात आलेल्या 100 टक्के क्षेत्रावरील स्वयंचलित ठिबक सिंचन याेजनेची पहाणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्यासाेबत काेल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) साै. उज्वला पळसकर याही उपस्थित हाेत्या.
साखर आयुक्त यांनी कारखान्यासही भेट देऊन उभारणीपासूनची सविस्तर माहिती घेतली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सभासद शेतकèयांसाठी कारखाना अत्यंत प्रभावीपणे ऊस विकास याेजना राबवित असल्याचे सांगितले. कारखान्याच्या मशिनरी उभारणीपासून सहवीज निर्मिती, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान, सभासद शेतकèयांसाठी विविध कल्याणकारी याेजना इत्यादीबाबत विविध उपक्रमांची सखाेल माहिती दिली.
यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि आर्थिक बांधिलकी जपून कारखाना सभासद शेतकèयांचे हित साधत आहे. कारखान्याच्या कृत्रिम बुध्दिमत्ता ऊस शेती तंत्रज्ञानामध्ये भाग घेतलेल्या शेतकèयांचा आणि ठिबक सिंचनसाठी सहकारी संस्थेचा सहभाग हा राज्यातील इतर कारखान्यांना अनुकरणीय असा असल्याचे नमूद केले. जवाहरसारखी ठिबक सिंचन याेजना इतर कारखान्यांनीही राबविली पाहिजे. कारखान्याने आतापर्यंत शासन, शेतकरी, कामगार, वित्तीय संस्था अशा काेणत्याही घटकाची थकबाकी ठेवलेली नाही ही एक अत्यंत जमेची बाजू असून कारखान्याचे सभासद, संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाची ही पाेहाेच पावती आहे असे प्रशंसनीय उद्गार काढले. मागील हंगामात ऊसाची कमतरता असल्याने राज्यातील सर्व कारखाने जेमतेम मार्चअखेरपर्यंत चालले. जवाहरसारख्या वैशिष्ट्यपूर्ण काम असणाèया कारखान्यांचे अनुकरण राज्यातील इतर कारखान्यांनी केले पाहिजे. ऊस विकास याेजनेद्वारे कारखान्यांनी जास्तीत जास्त एकरी ऊस उत्पादन वाढवून आर्थिकदृष्ट्या समृध्द हाेणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने राज्यातील निवडक कारखान्यांना माझ्या भेटी सुरू असल्याचे सांगितले. सभासद शेतकèयांनी टिशु कल्चरची राेपे अथवा ऊस वियांणांमध्ये बदल केल्यास निश्चितपणे ऊस उत्पादन वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारखान्याच्या समस्यांबाबत पाठपुरावा करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कारखान्याच्या एकंदरीत सर्व कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक श्री. मनाेहर जाेशी, तळंदगेचे जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन व संचालक उपस्थित हाेते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा