इचलकरंजीत शनिवारी हाेड्यांच्या शर्यती
इचलकरंजी-
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने शनिवार 8 ऑगस्ट राेजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीपात्रात हाेड्यांच्या शर्यती आयाेजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.
प्रतिवर्षी क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीन भव्य हाेड्यांच्या शर्यतीचे आयाेजन करण्यात येते. या स्पर्धेत इचलकरंजीसह काेल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बाेट क्लब यांचा सहभाग असताे. यंदा शनिवारी (8 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता ही स्पर्धा हाेणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे अध्यक्षतेखाली व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर माजी वस्त्राेद्याेग मंत्री प्रकाश आवाडे, क.आ.इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, अपर पाेलिस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी दीपक शिंदे व विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ हाेणार आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 25001/-, 17001/-, 15001/- व 7001/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यार्ते िफरती चांदीची गदा देण्यात येणार आहे, शर्यती पाहण्यासाठी शाैकिनांनी माेठ्या संख्येने यावे, असे आवाहन उपाध्यक्ष बाबासाे उफर् नंदू पाटील, सागर मगदूम, अहमद मुजावर यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




