ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी, ता. ४ 

आपटे वाचन मंदिरात १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथालयाच्या अध्यक्षा सौ. सुषमा दातार यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि मराठी साहित्याला दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथालयाचे कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी ग्रंथपाल श्री. आनंदा काजवे, वाचक श्री. प्रकाश पाटील, श्री. चांद सनदी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रंथालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिवादन करताना सुषमा दातार,काशिनाथ जगदाळे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा